Get Mystery Box with random crypto!

हा खेळ पैशांचा दिड शाहन्यास ही लाभते मोठेपण पात्रता नसते त् | 🌼🌻जीवनाचा प्रवास 🌻🌼✍️

हा खेळ पैशांचा

दिड शाहन्यास ही लाभते मोठेपण
पात्रता नसते त्याला मिळते थोरपण
गरीब अन श्रीमंतीचा अवघा मेळ हा
कसले नसीब पैशांचाच सारा खेळ हा

गिळून अपमान सारे पचवावे लागते
कोण सख्खे परके वेळच दाखवते
कागदी नोटांच्या मागे जो,तो धावतो
रिकामा खिसा सारी दुनिया दाखवतो

डाग चारित्र्याचा ही तेव्हा सुगंध होतो
पैसाच माणसाला मग सर्वश्रेष्ठ बनवतो
नाही पटणार पन अखेर हेच सत्य आहे
नात्याला नाही पैशालाच खरी किंमत आहे

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा
@vikas_sukhadhane